आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर कसे जोडायचे 2021 :
आजच्या काळात आधार कार्ड महत्त्वाचे ओळखपत्र आहे. त्याच्याशिवाय तुम्ही बँकेमध्ये अकाउंट ओपन करू शकत नाही आणि महत्त्वाच्या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. जर तुमचा आधार कार्ड हरवला किंवा खराब झाला, या परिस्थितीमध्ये तुम्ही ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करु शकता.
Table of contents

परंतु याच्यासाठी तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमच्या मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्याला करण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला माहीतच असेल आज आधार कार्ड च्या शिवाय अनेक काम होऊ शकत नाही. एक आधार कार्ड कायमसाठी सांभाळून ठेवणेही पॉसिबल नाही. अशा परिस्थितीमध्ये जर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असेल तर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तुमचा आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करू शकता.
विषय-सूची
- आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर लिंक कसे करावे?
- आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर कसे ऑनलाईन जोडावे?
- आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर चेंज किंवा अपडेट कसे करावे?
आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर लिंक कसे करावे?
जेव्हा आपण आधार कार्ड सेंटर मध्ये नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी अर्ज करतो त्यावेळी दुसऱ्या डिटेल्स च्या सोबत आपला मोबाईल नंबर ही विचारला जातो. हाच मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक होतो.
जर तुम्ही रजिस्ट्रेशन कर त्यावेळी आपला मोबाईल नंबर दिला नसेल तर तुमच्या आधार कार्डाशी मोबाईल नंबर जोडला जात नाही या कारणास्तव तुम्ही ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करू शकत नाही.
आपल्या आधार सोबत मोबाईल नंबर जोडण्यासाठी तुम्हाला परत आधार सेंटर वरती जावे लागेल. तिथे तुम्हाला परत एकदा बायोमेट्रिक डिटेल्स द्यावे लागतील त्यानंतरच तुमचा मोबाईल नंबर आधार सोबत लिंक होईल.
आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर कसे ऑनलाईन जोडावे?
काही लोकांना माहीत करून घ्यायचे आहे की ऑनलाइन द्वारा आधार ला मोबाईल नंबर कसे जोडायचे? हे संभव आहे का? आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आधार कार्डाशी जोडलेला मोबाईल नंबर महत्वाची भूमिका साकार करतो. जसे ऑनलाइन आधार डाउनलोड, बायोमेट्रिक डाटा लॉक आणि आधार नंबरद्वारे E-SIGN करायचे असल्यास. या सर्व गोष्टी करण्यासाठी मोबाईल नंबर वरती ओटीपी येतो. या ओटीपी द्वारा तुम्ही स्वतः व्हेरिफाय करू शकता.
त्यामुळे सिक्युरिटी ला ध्यानात ठेवून UIDAI च्या तर्फे कुठलीही सुविधा दिलेली नाही. आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार सेंटर वर जावे लागेल. तिथे तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स घेतले जातील. त्याच्यानंतर तुमचे आधारशी मोबाईल नंबर जोडला जाईल.
आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर चेंज किंवा अपडेट कसे करावे?
जर आधार रजिस्ट्रेशन च्या वेळी चुकीचा नंबर दिलेला असेल किंवा तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर बंद झाला असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेन्ज किंवा अपडेट करावा लागेल.
आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर चेंज किंवा अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार सेंटर वर जाऊन बायोमेट्रिक डिटेल्स द्यावे लागतील. तेव्हा मोबाईल नंबर चेंज किंवा अपडेट होऊ शकेल. त्याच्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही म्हणजे तुम्ही स्वतः ऑनलाइन द्वारा करू शकत नाही.
सारांश
अशाप्रकारे तुम्हाला समजले असेल की आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर कसे जोडायचे. या लेखामध्ये रजिस्टर मोबाईल नंबर चेंज किंवा अपडेट करण्यासाठी माहिती दिलेली आहे. जर याच्या संबंधित तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता.
आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर लिंक, चेंज किंवा अपडेट करण्यासाठी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर या लेखाला शेअर करायला विसरू नका. शेअर करण्यासाठी खाली शेअर बटन ची सुविधा दिलेली आहे. या साईट वरती आम्ही अशा प्रकारची उपयोगी माहिती मराठी भाषेमध्ये देत असतो. जर ही साइट तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर गूगल वरती सर्च करून तुम्ही या साइटवर येऊ शकता. धन्यवाद.