आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी 2021 Aadhaar cardsathi aavshk kagajptranchi yadi 2021

आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी 2021

आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. आधार कार्ड आजच्या काळामध्ये किती महत्त्वाचा झाला आहे हे तुम्हाला माहीतच आहे. बँकेमध्ये खाते ओपन करायचे असो किंवा सरकारी राशन दुकानातून राशन घ्यायचे असो सर्व ठिकाणी आधार कार्ड बंधन कारक झालेले आहे.

जर अजून पर्यंत तुमचा आधार कार्ड  बनवला नसेल तर लवकर बनवून घ्या. या लेखामध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी आवश्यक डॉक्यूमेंटची यादी देण्यात येत आहे. ज्याच्या द्वारा तुम्ही अत्यंत सहजरित्या जवळच्या आधार सेंटर वर जाऊन तुमचा आधार कार्ड बनवू शकता.

आधार कार्ड बनवण्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट मध्ये ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि जन्मतारीख पुरावा संबंधित कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. त्याच्यासोबत पासपोर्ट साईज फोटो लागेल. तर चला मग, माहिती घेऊया ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि जन्मतारीख पुरावाच्या साठी  कोण कोणते डॉक्युमेंट वैध आहेत.

विषय-सूची

 • ओळखीचा समर्थित पुरावा (POI) यादी
 • पत्त्याचा समर्थित पुरावा (POA) यादी
 • जन्मतारखेचा समर्थित पुरावा (DOB) यादी

ओळखीचा समर्थित पुरावा (POI) यादी

 • पासपोर्ट
 • पैनकार्ड
 • राशन कार्ड
 • वोटर आईडी कार्ड
 • ड्राइविंग लाइसेंस
 • PSU द्वारे जारी केलेले सरकारी फोटो ओळखपत्र/ सेवा फोटो ओळखपत्र
 • NREGS जॉब कार्ड
 • मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेने जारी केलेला फोटो आयडी
 • शस्त्र परवाना
 • फोटो बँक एटीएम कार्ड
 • फोटो क्रेडिट कार्ड
 • पेंशनर फोटो कार्ड
 • स्वातंत्र्य सैनिक फोटो कार्ड
 • किसान फोटो पासबुक
 • CGHS / ECHS फोटो कार्ड
 • पोस्ट विभागाने जारी केलेले नाव आणि फोटो असलेले पत्ता कार्ड
 • लेटरहेडवर राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांनी दिलेला फोटो असल्याचे ओळखीचे प्रमाणपत्र
 • संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार/प्रशासनांनी जारी केलेले अपंगत्व ओळखपत्र/अपंग वैद्यकीय प्रमाणपत्र

पत्त्याचा समर्थित पुरावा (POA) यादी

 • पासपोर्ट
 • बैंक स्टेटमेंट /पासबुक
 • पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट/पासबुक
 • राशन कार्ड
 • वोटर कार्ड
 • ड्राइविंग लाइसेंस
 • PSU द्वारे जारी केलेले सरकारी फोटो ओळखपत्र/सेवा फोटो ओळखपत्र
 • वीज बिल (3 महिन्यांपेक्षा जुने चालणार नाही)
 • पाणी बिल (3 महिन्यांपेक्षा जुने चालणार नाही)
 • टेलिफोन लँडलाइन बिल (3 महिन्यांपेक्षा जुने  चालणार नाही)
 • मालमत्ता कर पावती (1 वर्षापेक्षा जुने चालणार नाही)
 • क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (3 महिन्यांपेक्षा जुने चालणार नाही)
 • विमा पॉलिसी
 • लेटरहेडवर बँकेचा फोटो असलेले स्वाक्षरी केलेले पत्र
 • लेटरहेडवर नोंदणीकृत कंपनीने जारी केलेले फोटो असलेले स्वाक्षरी केलेले पत्र
 • लेटरहेडवर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले फोटो असलेले स्वाक्षरी केलेले पत्र
 • NREGS जॉब कार्ड
 • शस्त्र परवाना
 • पेन्शनर कार्ड
 • स्वातंत्र्य सैनिक कार्ड
 • किसान पासबुक
 • CGHS / ECHS कार्ड
 • लेटरहेडवर खासदार किंवा आमदार किंवा राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांनी दिलेला फोटो असलेले पत्त्याचे प्रमाणपत्र
 • गाव पंचायत प्रमुख किंवा त्याच्या समतुल्य प्राधिकरणाने जारी केलेले पत्त्याचे प्रमाणपत्र (ग्रामीण भागांसाठी)
 • इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर
 • वाहन नोंदणी (आरसी बुक)
 • नोंदणीकृत विक्री/लीज/भाडे करार
 • पोस्ट विभागाने जारी केलेले फोटो असलेले पत्ता कार्ड
 • राज्य सरकारने जारी केलेले फोटो असलेले जात आणि अधिवास प्रमाणपत्र.
 • संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार/प्रशासनांनी जारी केलेले अपंगत्व ओळखपत्र/अपंग वैद्यकीय प्रमाणपत्र
 • गॅस कनेक्शन बिल (3 महिन्यांपेक्षा जुने चालणार नाही)
 • जोडीदाराचा पासपोर्ट
 • पालकांचा पासपोर्ट (अल्पवयीन असल्यास)
 • केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले निवासाचे वाटप पत्र (3 वर्षांपेक्षा जास्त जुने चालणार नाही)
 • पत्त्यासह सरकारने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र.

जन्मतारखेचा समर्थित पुरावा (DOB) यादी

 • जन्म प्रमाणपत्र
 • SSLC पुस्तक/प्रमाणपत्र
 • पासपोर्ट
 • लेटरहेडवर गट अ राजपत्रित अधिकाऱ्याने जारी केलेले जन्मतारखेचे प्रमाणपत्र
 • पैन कार्ड
 • कोणत्याही सरकारी मंडळाने किंवा विद्यापीठाने जारी केलेले मार्कशीट
 • DOB असलेले PSU द्वारे जारी केलेले सरकारी फोटो आयडी कार्ड / फोटो ओळखपत्र
 • केंद्रीय/राज्य पेन्शन पेमेंट ऑर्डर
 • केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा योजना फोटो कार्ड किंवा माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना फोटो कार्ड

तर हे होते आधार कार्ड साठी आवश्यक कागदपत्रांची यादी. त्याच्या द्वारा तुम्ही अत्यंत सहजरीत्या आपला आधार कार्ड बनवू शकता.

सारांश

आशा आहे की आधार कार्ड साठी कोण कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत? हे तुम्हाला समजले असेल. जर तुमच्या कुटुंबातील कुणाचा आधार कार्ड बनवलेला नसेल तर वरती सांगितलेल्या डॉक्युमेंट्स ला सोबत घेऊन आधार कार्ड केंद्रा वरती जावे.

आधार कार्ड बनवण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स ची माहिती आवडली असेल तर या लेखाला शेअर करायला विसरू नका. शेअर करण्यासाठी खाली शेअर नावाचे बटन दिलेले आहे. तुम्हालाही साईट आवडली असेल तर गूगल वरती सर्च करून तुम्ही इथे येऊ शकता. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment