आयुष्मान भारत योजनेमध्ये ऑनलाइन नोंदणी कशी करावी? Aayushamaan bharat yojnemadhe online nodnee kasi karavi?

आयुष्मान भारत योजना

आयुष्मान भारत योजनेची घोषणा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2018 ला केली आणि 25 सप्टेंबर 2018 रोजी त्याला देशात औपचारिकपणे केले गेले.

Table of contents

या योजनेच्या अंतर्गत देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल  कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला गरज पडल्यास दरवर्षी 5 लाख पर्यंतची रक्कम मोफत उपचार म्हणून दिली जाते. त्यामुळे देशातील लोकांना अकाली आरोग्यशी संबंधित येणाऱ्या समस्या पासून सुटकारा मिळणार आहे.

चला मग या योजनेच्या बाबतीत सविस्तरपणे जाणून घेऊया की या योजनेअंतर्गत जारी करण्यात आलेले आरोग्य कार्ड  कसे बनवले जातात आणि त्याच्यासाठी कोण कोण व्यक्ती पात्र असतील? याची पडताळणी कशी करायची? तर चला सुरू करूया.

विषय सूची

 • आयुष्यमान भारत योजना
 • प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेचा लाभ
 • आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येणारे आजार
 • आयुष्यमान भारत योजनाच्या अंतर्गत नसणारे आजार
 • पीएम आयुष्मान योजनेसाठी आवश्यक  कागदपत्रे
 • आयुष्यमान भारत योजनेच्या पात्रतेची पडताळणी कशी करायची?
 • आयुष्मान भारत योजनाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन कसे करावे?

आयुष्यमान भारत योजना

प्रत्येक देशाप्रमाणे भारतात सुद्धा अनेक कुटुंबे राहतात जे  आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अनेक संघर्ष करून आपले जीवन जगत आहेत आणि या परिस्थितीमध्ये आपल्या कुठल्याही सदस्याला आरोग्याच्या संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते तर त्याचा उपचार करण्यासाठी त्या लोकांना अजून जास्त अडचणीचा सामोरा करावा लागतो. याव्यतिरिक्त बऱ्याचदा वेळेवर उपचार न भेटल्यामुळे लोकांचा मृत्यू पण होऊन जाते. हे लक्षात घेऊन भारत सरकार द्वारा आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे ज्याला आपण जना आरोग्य योजना या नावाने देखील ओळखतो.

या योजनेच्या अंतर्गत देशातील सुमारे 10 करोड लोकांसाठी  आरोग्य कार्ड दिले जातील याचा वापर करून ते भविष्यामध्ये सरकार द्वारा निवडलेल्या हॉस्पिटल मधून उपचार घेऊ शकतील.

प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेचा लाभ

जर तुम्ही या योजनेबाबत वाचत असाल तर तुम्हाला या गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे की या योजनेच्या प्रारंभा नंतर देशातील लोकांना काय लाभ होणार आहे.  जे खालील प्रमाणे आहे.

 • आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या जीवन विमा दिला जाईल.
 • या योजनेअंतर्गत सरकार द्वारा 10 करोड योजनेचा लाभ देण्याचा लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 • PMJAY योजनेमध्ये त्या कुटुंबीयांना समाविष्ट केले जाते जो 2011 मध्ये सूचीबद्ध आहे.
 • या योजनेच्या सुरू झाल्यानंतर गरीब लोकांच्या जीवन स्तरामध्ये सुधार येईल आणि ते आर्थिक दृष्ट्या मजबूत होतील कारण लोकांचा उपचार करण्यासाठी लोकांना भरपूर मोठी जमापुंजीचा भार उचलावा लागतो.
 • या योजनेच्या अंतर्गत 1350 आजारावरती उपचार केले जातील.
 • या योजनेचे संचालन आरोग्य मंत्रालय द्वारा सुरू करण्यात आलेले आहे.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येणारे आजार

 • डबल वाल्व रिप्लेसमेंट
 • Pulmonary वाल्व रिप्लेसमेंट
 • एंटीरियर स्पाइन फिक्सेशन
 • टिश्यू एक्सपेंडेर
 • Larygopharyngectomy
 • बाईपास पद्धतीने कोरोनरी आर्टरी  बदलणे
 • प्रोस्टेट कैंसर
 • करोटिड एनजीओ प्लास्टिक
 • स्कल बेस सर्जरी

आयुष्यमान भारत योजनाच्या अंतर्गत नसणारे आजार

 • ओपीडी
 • फर्टिलिटी सम्बंधित प्रक्रिया
 • कॉस्मेटिक संबधित प्रक्रिया
 • अंग प्रत्यारोपण
 • व्यक्तिगत निदान
 • ड्रग रिहैबिलेशन

पीएम आयुष्मान योजनेसाठी आवश्यक  कागदपत्रे

या योजनेसाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज भासेल. ते खालील प्रमाणे आहेत.

 •  कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड
 •  मोबाईल नंबर
 •  राशन कार्ड
 •  पत्ता पुरावा

आयुष्यमान भारत योजनेच्या पात्रतेची पडताळणी कशी करायची?

तर कोणीही व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेच्या पात्रतेची पडताळणी करण्यास इच्छुक असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स ना फॉलो करू शकतात जे अशा प्रकारे आहेत.

 • त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या योजनेच्या संबंधित ऑफिशिअल वेबसाईट https://pmjay.gov.in/ वरती जावे लागेल.
 • त्याच्यानंतर त्या वेबसाइट  चा होम पेज वरती “Am I Eligible” चा ऑप्शन दिसेल ज्याच्यावरती तुम्हाला क्लिक करावे लागेल.
 • त्याच्यानंतर तुमच्या स्क्रीन वरती पुढचा पेज ओपन होईल.
 • जिथे तुम्हाला मोबाइल नंबर आणि कैप्चर कोड घालावा लागेल आणि Generate OTP वरती क्लिक करावे लागेल.
 • याच्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबरवरती एक OTP  येईल ज्याला तुम्हाला भरावा लागेल.
 • आता तुम्ही आयुष्मान भारत योजनाच्या वेबसाइटवर लॉगिन होणार.
 • याच्या नंतर पात्रतेची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे असेल.
 • आणि पुढच्या ऑप्शन मध्ये तीन श्रेणियां दिसतील. जिथे तुम्हाला नाव, राशन कार्ड आणि मोबाईल नंबर पैकी एकाला निवडावे लागेल.
 • आणि विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
 • याच्यानंतर तुमच्यासमोर पुढील पेज ओपन होईल. इथे तुम्हाला योजनेसाठी तुमची पात्रता बघायला मिळेल.
 • याच्या व्यतिरिक्त तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्रा वरती जाऊन तुमच्या पात्रतेची तपासणी करून घेऊ शकता. ज्याच्यासाठी तुम्हाला तुमचे ओरिजनल कागदपत्रे  घेऊन CSC एजंट जवळ जावे लागेल. ज्याच्या द्वारे तो तुम्हाला वेबसाईट वर लॉगिन करून सांगेल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही.

आयुष्मान भारत योजनाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन कसे करावे?

जर तुम्ही आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ इच्छिता तर खालील दिलेले माहितीला चालू करू शकता, जी अशाप्रकारे आहे.

 • योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला  तुमचे ओरिजनल कागदपत्रे घेऊन CSC केंद्र एजंट जवळ जावे लागेल आणि ओरिजिनल कागदपत्रांची फोटोकॉपी जमा करावी लागेल.
 • याच्यानंतर एजंट द्वारा तुमच्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी करून नोंदणी सुनिश्चित केली जाईल आणि तुम्हाला नोंदणी नंबर दिला जाईल.
 • 10 ते 15 दिवसानंतर तुम्ही जनसेवा केंद्रा वरती जाऊन तुम्ही तुमचा आरोग्य कार्ड घेऊ शकता.

हेल्पलाइन नंबर

जर तुम्हाला या योजनेच्या संबंधित कुठल्याही प्रकारची कुठलीही माहिती पाहिजे असेल तर विभागाद्वारे देण्यात आलेल्या हेल्पलाइन नंबर 14555/1800111565 वर संपर्क करू शकता.

सारांश

आज आम्ही तुम्हाला या आर्टिकल च्या माध्यमाने आयुष्यमान भारत योजना याबाबतीत सविस्तरपणे माहिती शेअर केलेली आहे आणि त्याच्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आशा करतो की हा लेख तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला उपयोगी सिद्ध झाला असेल. याव्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारू शकता. आमची टीम तुमच्या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment