गाडी नंबरद्वारे मालकाचे नाव शोधण्याचा सोपा मार्ग
जेव्हा आपण नवीन कार, बाईक किंवा इतर वाहन खरेदी करतो तेव्हा आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. पण तुम्हाला जुनी कार, बाईक घ्यायची असेल, तर ते वाहन दुसऱ्याच्या नावावर रजिस्टर्ड असते. अशा परिस्थितीत, सेकंड हँड गाडी घेण्यापूर्वी, आपण ज्याच्याकडुन घेत आहोत ते खरे मालक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
Table of contents

परिवहन विभागानेही ही सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही कोणत्याही गाडी नंबर वरून मालकाचे नाव शोधू शकता. म्हणजेच नंबर प्लेट/ गाडी नंबर वरून मालकाचा डिटेल्स काढल्या जाऊ शकतात. चला तर मग आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये सांगू की गाडी नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे?
ऑनलाइन गाडी नंबर वरून आपण घरी बसल्या मालकाचे नाव शोधू शकतो. याशिवाय मोबाईल ॲपचीही सुविधा आहे. तुमच्याकडे फक्त त्या गाडीचा नंबर असणे आवश्यक आहे. चला तर मग आधी तुम्हाला ऑनलाइन सुविधेबद्दल सांगतो.
विषय-सूची
- गाडी नंबर वरून गाडीच्या मालकाचे नाव ऑनलाइन कसे जाणून घ्यावे?
- मोबाईलवरून गाडीच्या मालकाच्या नावाचे डिटेल्स कसे काढायचे?
गाडी नंबर वरून गाडीच्या मालकाचे नाव ऑनलाइन कसे जाणून घ्यावे?
यासाठी सर्वप्रथम इथून parivahan.gov.in/parivahan वर जावे लागेल. त्यानंतर परिवहन सेवेची वेबसाइट ओपन होईल. होमपेजवर अनेक ऑप्शन्स मिळतील. मालकाचे नाव शोधण्यासाठी, आम्हाला Online Services ऑप्शनवर जावे लागेल. त्यानंतर खालील स्क्रीनशॉटप्रमाणे Know Your Vehicle Detail सिलेक्ट करा.

पुढील स्टेप मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल. येथे ज्या गाडीच्या मालकाचे नाव तुम्हाला जाणून घ्यायचे आहे त्या गाडीचा नंबर टाका. यानंतर खालील स्क्रीनशॉटमध्ये दाखविल्याप्रमाणे Check Status ऑप्शन सिलेक्ट करा.

तुम्ही गाडी नंबर भरताच आणि Check Status ला सिलेक्ट करा, त्या गाडी मालकाचे नाव दिसेल. याशिवाय, तुम्हाला Registration Authority संबंधित डिटेल्स, रजिस्ट्रेशन तारीख, गाडीचे मॉडेल देखील मिळेल. आपण खालील स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता.

अशा प्रकारे, आपण घरी बसून गाडी मालकाचे नाव ऑनलाइन शोधू शकतो. याशिवाय परिवहन विभागाचे मोबाइल ॲप आहे. याद्वारे कोणत्याही गाडीच्या मालकाचे नाव सहज कळू शकते.
मोबाईलवरून गाडीच्या मालकाच्या नावाचे डिटेल्स कसे काढायचे?
गाडीच्या मालकाचे नाव जाणून घेण्यासाठी, mParivahan नावाचे एप्लीकेशन तुमच्या अँड्रॉइड मोबाइलवर डाउनलोड करा. हे परिवहन विभागाचे ऑफिशियल एप्लीकेशन असून सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी हे एप्लीकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तुम्ही हे ॲप इथून डाउनलोड करू शकता.
तुमच्या फोनवर mParivahan ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा आणि तुम्हाला ज्या गाडीच्या मालकाचे नाव जाणून घ्यायचे आहे त्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि सर्च करा. ऑनलाइन सुविधेबद्दल वर सांगितल्याप्रमाणे हा एप्लीकेशन देखील समान डिटेल प्रोवाइड करतो.
सारांश
अशा प्रकारे आपण गाडीच्या मालकाचे नाव ऑनलाइन आणि मोबाईल ॲप द्वारे शोधू शकतो. मी या पोस्टमध्ये त्याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर गाडी नंबर वरून मालकाचे नाव शोधण्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा तुम्हाला त्यासंबंधी काही प्रश्न असतील तर तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता.
नंबर प्लेट/ गाडी नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे याबद्दल दिलेली माहिती आवडल्यास ही पोस्ट शेअर करायला विसरू नका. शेअर करण्यासाठी खाली शेअर बटण सुविधा दिलेली आहे. धन्यवाद.