हरवलेला पॅन कार्ड नंबर कसा मिळवायचा? Haravlela PAN card number kasa milvaycha?

हरवलेला पॅन कार्ड नंबर कसा मिळवायचा?

पॅन कार्ड आजच्या काळामध्ये एक महत्वाचा दस्तऐवजाची भूमिका बजावते कारण बँकेच्या संबंधित बहुतांश कामे जसे अकाउंट ओपन करणे, टॅक्स भरणे इत्यादी सर्व कामासाठी याची आवश्यकता असते. 

पण जर काही कारणास्तव तुमच्या पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर  पॅन कार्ड वापरून होणारी सर्व कामे बंद होतील म्हणून आज आम्ही तुम्हाला त्या लेखाच्या माध्यमाने सांगणार की तुम्ही कशा प्रकारे हरवलेल्या कार्ड नंबर प्राप्त करू शकता जर तुमच्याकडे हरवलेल्या पॅन कार्ड चा नंबर उपलब्ध असेल.

विषय सूची

 • पॅन कार्ड काय आहे?
 • पॅन कार्ड नंबर कसा मिळवायचा?
 • ऑनलाइन डुप्लिकेट पॅन कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
 • डुप्लिकेट किंवा रीप्रिंट पॅन कार्ड साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
 • नवीन डुप्लिकेट पॅन कार्ड कधी येणार?

पॅन कार्ड काय आहे?

पॅन कार्ड हे आयकर विभागात द्वारे जारी केलेले एक  ऑफिशियल दस्तऐवज आहे. याच्यावर एक नंबर टाकला जातो आणि हा नंबर प्रत्येक पॅनकार्डसाठी वेगळा असतो ज्याच्या द्वारे मोठे बिझनेस मॅन लोक इन्कम टॅक्स भरतात. याच्याशिवाय, बँक मध्ये खाते उघडण्यासाठी देखील याची आवश्यकता असते. बहुतांशी बँकेमध्ये खाते ओपन करण्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक केले आहे.

चला मग सविस्तरपणे याची माहिती घेऊया की, तुम्ही कशा प्रकारे हरवलेल्या पॅन कार्डचा नंबर मिळवू शकता आणि त्याला रीप्रिंट करण्यासाठी अर्ज कसे करू शकता.

पॅन कार्ड नंबर कसा मिळवायचा?

जर तुमचा पॅन कार्ड हरवला असेल, चोरीला गेला असेल, अशापरिस्थितीमध्ये तुम्ही खालील दिलेल्या स्टेप्स ला फॉलो करून नंबर प्राप्त करू शकता आणि त्याचा उपयोग करून पॅन कार्ड  रीप्रिंट किंवा डुप्लिकेट पॅन कार्ड साठी अर्ज करू शकता.

 • पॅन कार्ड नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयकर विभागाच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला Quick Link सेक्शनमध्ये जाऊन Know Your PAN/TAN/AO  हा ऑप्शन निवडावा लागेल.
 • क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्या स्क्रीनवर पेज ओपन होईल.
 • जिथे तुम्हाला काही महत्त्वाची माहिती भरायची आहे जसे की नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी
 • सर्व माहिती भरल्यानंतर सबमित वर क्लिक करावे लागेल.
 • सबमिशन केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाईल.
 • त्या नंतर दिलेल्या बॉक्स मध्ये ओटीपी टाकावा लागेल आणि  validate च्या  ऑप्शन वर क्लिक  करावे लागेल.
 • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • जिथे तुम्हाला पॅन कार्ड शी संबंधित सर्व माहिती जसे की पॅन कार्ड नंबर, जन्मतारीख इत्यादी

टीप- जर काही कारणास्तव वरती सांगितल्या गेलेल्या   स्टेप्सला फॉलो करून तुम्हाला पॅन कार्ड नंबर मिळत नसेल तर तुम्ही आयकर विभागाद्वारे जारी केलेल्या टोल फ्री क्रमांक 1800-180-1961 किंवा 1961 वरती कॉल करू शकता आणि पॅन कार्ड च्या संबंधित माहिती प्राप्त करू शकता. ही सुविधा सोमवार ते शनिवार सकाळी 08:00 ते रात्री 22:00 पर्यंत उपलब्ध आहे.

ऑनलाइन डुप्लिकेट पॅन कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड पॅन रीप्रिंट करण्यासाठी अर्ज करू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून त्या मूळ कागदपत्रांची माहिती अगोदर शेअर केली आहेत. ते अशा प्रकारे आहेत.

 • आयडी प्रूफ
 • ऍड्रेस प्रूफ
 • जन्मतारखेचा कोणताही पुरावा
 • पासपोर्ट साईज फोटो
 • स्वाक्षरी ज्या स्कॅन करुन अपलोड  करायच्या आहेत

डुप्लिकेट किंवा रीप्रिंट पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

आशा करतो की वर नमूद केलेल्या माहितीला फॉलो करून तुम्ही तुमचा पॅन कार्ड नंबर मिळवला असेल, आता जर तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्ड प्राप्त करण्यासाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या पॉईंट्स ना फोलो करू शकता. ते अशा प्रकारे आहेत.

 • यासाठी तुम्हाला प्रथम विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. incometax.gov.in
 • त्यानंतर जर तुमचा या वेबसाईटवर पहिल्यापासून अकाऊंट असेल तर तुम्हाला रजिस्टर वर क्लिक करून लॉग इन करावे लागेल आणि जर तुमचा अकाउंट नसेल तर तुम्हाला Apply online select  वरती क्लिक  करावे लागेल.
 • विचारलेली सर्व माहिती भरून अकाउंटला लॉगिन करावे लागेल.
 • लक्षात ठेवा कि इथे तुम्हाला Application type मध्ये तुम्हाला changes or correction in existing PAN  date/ Reprint of PAN (No changes in existing pan data) ला सिलेक्ट करावे लागेल.
 • आणि नंतर कॅटेगरीमध्ये तुमचे वैयक्तिक पॅन कार्ड  असल्यास Individual निवडावे लागेल, बाकी तुमच्याकडे इतर कोणत्याही प्रकारचे पॅनकार्ड असल्यास ते निवडावे लागेल.
 • त्यानंतर application form मध्ये विचारलेली सर्व मूलभूत माहिती जसे की नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी भरून नंतर दिलेल्या कैप्चर कोड टाकावा लागेल आणि सबमित वर क्लिक करावे लागेल.
 • क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर येईल जो तुम्हाला कुठेतरी लिहून सुरक्षित करावा लागेल कारण याच्या मदतीने तुम्हाला पुढे लॉगिन करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला Continue With PAN Application Form वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल.
 • इथे तुम्हाला Submit Digitally through e – KYC & E – Sing (Paperless)  च्या ऑप्शनला निवडू शकता. तुम्ही तो कधीही निवडल्यास तुम्हाला कोणतेही डॉक्यूमेंट अपलोड करावे लागणार नाही आणि तुमच्या आधार कार्ड नुसार सर्व माहिती भरली जाईल.
 • आणि जर तुम्ही दुसरे ऑप्शन निवडत असाल तर तुम्हाला मूळ कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला आधार नंबर, पॅन कार्ड नंबर अगोदर पासून भरलेला मिळेल.
 • आणि इतर जी  माहितीची भरलेली नाही, ती तुम्हाला भरावी लागेल आणि नेक्स्ट वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला ऍड्रेस फ़ॉर कम्युनिकेशन च्या विषयी विचारले जाईल, जिथे तुम्हाला काहीही बदलण्याची गरज नाही आणि कंट्री कोड मध्ये इंडिया ला सिलेक्ट करायचे आहे आणि मोबाईल नंबर चेक करून नेक्स्ट वरती क्लिक करा.
 • आता तुम्हाला पुढील सेक्शनमध्ये Pan card च्या  option मध्ये  “Copy Of PAN Card” ला  सलेक्ट  करायचे आहे आणि Declaration Details भरून सबमिट वर क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर तुम्हाला विभागाद्वारे  ठरवून दिलेली फी भरावी लागेल.
 • आणि मग तुमच्या आधार कार्ड वरून रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल. जे तुम्हाला घालून सबमिट करावे लागेल.
 • अशाप्रकारे ऑनलाइन डुप्लिकेट पॅन कार्ड ची प्रोसेस पूर्ण होईल आणि तुम्हाला Acknowledgement slip प्राप्त होईल.
 • जे तुम्हाला सुरक्षित ठेवावे लागेल कारण भविष्यात तुम्ही त्याच्या मदतीने पॅन कार्ड ट्रॅक करू शकता.

नवीन डुप्लीकेट पैन कार्ड  कधी येणार?

अर्ज केल्यानंतर 30 ते 40 दिवसांच्या आत, विभागाद्वारे  पोस्टाच्या माध्यमाने पॅन कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर पोहोचवले जाईल.

सारांश

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला हरवलेल्या पॅन कार्ड नंबर कसा मिळवायचा याविषयी सविस्तर पणे माहिती शेअर केली आहे. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुमच्या मनामध्ये या लेखाबद्दल कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू.

Share on:

Leave a Comment