पॅनकार्ड मध्ये दुरूस्ती कशी करावी ?। Pancard Madhye Durusti Kashi Karavi ?

नमस्कार मित्रांनो, येथे तुमचे स्वागत आहे. या पोस्ट मध्ये जाणून घ्या की पॅनकार्ड मध्ये दुरूस्ती कशी करावी. जसे की आपल्या सर्वांना माहितच आहे की पॅनकार्ड खूप महत्वाचे डॉक्यूमेंट आहे. जसे की बॅंके अथवा इतर कामांसाठी पॅनकर्ड लागतेच. जर पॅनकार्ड आपल्याजवळ नसेल तर आपण बॅंकेत आपले खाते उघडू शकत नाही. यासाठी आपल्याजवळ पॅनकार्ड असणे गरजेचे आहे.

Image result for पॅनकार्ड

भारतामध्ये पॅनकार्डचा उपयोग खूप प्रमाणात वाढला आहे. बॅकेबरोबरच इतरही ब-याच  कामांसाठी पॅनकार्ड खूप महत्वाचे डॉक्यूमेंट बनले आहे, यामुळेच भारतातील जास्तीत जास्त लोकं आपले पॅनकार्ड बनवून घेत आहेत, आणि बरेचजण यासाठी अर्जही करत आहेत. याच बरोबर अजून एक गोष्ट बघायला मिळत आहे की बरेच लोकं आपले पॅनकर्ड ऑनलाईन करून घेत आहेत. कधीकधी आपल्यासोबत पॅनकार्डमध्ये लहान मोठी चूक होते. जसे की नांवात चूक होणे, पत्ता चूकीचा असणे अश्या अनेक गोष्टींमुळे आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो.

पण आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्याही व्यक्तीच्या पॅनकार्डमध्ये काही चुकीचे असेल व त्यात सुधारणा करायची असेल तर ते सगळे सोप्या पद्धतीने करता येते. परंतू लोकांना याबद्दल माहितीच नसते. जर पॅनकार्ड मध्ये कोणत्याची प्रकारची चुकीची माहिती असेल तर ती व्यक्ती मोठ्या अडचणीत सापडू शकते. पण ही पोस्ट संपूर्ण वाचल्यानंतर अश्या प्रकारची कोणतीही अडचण दूर करु शकता आणि सोप्या पद्धतीने तुमच्या पॅनकार्डमध्ये सुधारणा करु शकता. ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

ऑनलाइन पॅनकार्ड कसे बनवून घ्यावे

पॅनकार्डची संपूर्ण माहिती मराठीमधून

पॅनकार्डमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा कोणत्याही कॅफेत जाण्याची गरज नाही, तुम्ही हे घरबसल्या करू शकता. खरचं जर तुम्हाला तुमच्या पॅनकार्ड मध्ये काही सुधारणा करुन घेणार आहात तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. आम्ही या पोस्टमध्ये पॅनकार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी काही सोप्या पाय-या वेगवेगळ्या भागांत सांगितल्या आहेत, ज्यामुळे आपण हे सोप्या पद्धतीत करू शकता. तर आपण आम्हाला फॉलो करा.

 • प्रथम आपल्याला पॅनकार्डच्या ऑफिशियल वेबसाईट www.nsdl.com उघडावी लागेल.
 • या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करू शकता आणि पॅनकार्डमध्ये कोणतेही बदल करू शकता.
 • या साईटवर गेल्यावर आपल्याला फॉर्म मिळेल जिथे आपली काही माहिती द्यावी लागेल.

भाग १

 • अर्जाची पद्धत – येथून आपण नवीन पॅनकार्डसाठीही अर्ज करू शकता, पण आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर चेंज किंवा करेक्शन इन एक्झिस्टींग वर क्लिक करा.
 • कॅटॅगरी – येथे आपल्याला इंडिव्यूशवल दाबावे लागेल.

भाग

 • अर्जाची माहिती – येथे आपल्याला जन्मतारीख, मोबाईल नंबर, इत्यादी सर्व माहिती भरावी लागेल आणि शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा.
 • नंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर आपले रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तुमचा टोकन नंबर स्क्रिनवर येईल, तो आपल्याला लिहून ठेवावा लागेल. कारण आपण या नंबरवरून लॉगिन करून अपूर्ण काम पुर्ण करू शकता.
 • टोकन नंबर लिहून झाल्यावर खाली कंटिन्यू वर क्लिक करा.
 • येथे आपल्याला सर्वात आधी सबमिट डिजीटली थ्रू वर क्लिक करा.
 • आता आपल्याला पॅनकार्ड अर्ज भरावा लागेल. 

पॅन अर्जचा फॉर्म

भाग १

 • पॅन नंबर – येथे आपला पॅनकार्ड नंबर लिहावा लागेल.
 • आधार नंबर – येथे आपल्याला आपला आधार नंबर लिहावा लागेल.

भाग

 • अर्जदाराचे पुर्ण नाव
 • टायटल – श्री.  …..
 • शेवटचे नाव – आपले शेवटचे नाव
 • पहिले नाव – आपले पहिले नाव
 • पुर्ण नाव – येथे आपले पुर्ण नाव लिहायचे आहे. जे पॅनकार्ड वर प्रिंट होईल.
 • जन्मतारीख आणि लिंग – आपली जन्मतारीख लिहा . लिंग लिहा.

भाग

 • येथे आपल्या पालकांचे नाव घालून वर क्लिक करा.
 • येथे आपला पत्ता असलेला नेक्स्ट रकाना दिसेल तो मोकळा ठेवायचा आहे.
 • येथे आपला कंट्री कोड सिलेक्ट करून आपला नंबर लिहून नेक्स्ट वर क्लिक करा.

भाग

 • येथे आपण प्रुफ ऑफ पॅन हे सिलेक्ट करा.
 • नंतर येथे आपल्याला डिक्लेरेशन मध्ये आपले नाव आणि तो किंवा ती सिलेक्ट करायचे आहे, आणि नंबर डॉक्यूमेंट मध्ये १ एंटर करावा लागेल, आणि या जागेत आपल्या शहराचे नाव लिहून सबमिट वर क्लिक करा.
 • आता येथे आपल्याला पॅनकार्डची फी भरावी लागेल.
 • फी भरल्यानंतर पेमेंट नोटीस बघून आपण कंटीन्यू वर क्लिक करा.
 • आता आपण पॅनकार्डला ऑथेंटिकेट करावे लागेल, म्हणजेच यासाठी आपल्याला येथे ऑथेंटिकेट वर क्लिक करा.
 • नंतर येथे आपल्याला कंटिन्यू के वाय सी म्हणून एक ऑपशन मिळेल तिथे आपल्याला क्लिक करायचे आहे.
 • आता आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी आला असेल जो आधार कार्डशी लिंक असेल.
 • येथे आपण एंटर करून सबमिट वर क्लिक करा.
 • नंतर येथे आपल्याला एक नंबर मिळेल जो आपल्याला लिहून ठेवावा लागेल, कारण आपल्याला त्या नंबर वरून आपला पॅनकार्ड स्टेटस चेक करू शकत.
 • अभिनंदन, आता आपले पॅनकार्ड दुरुस्त झाले आहे, जे की २५ ते ३० दिवसात आपल्या पत्यावर मिळेल.

निष्कर्ष

तर मित्रांनो ही आहे आपली आजची पोस्ट – पॅनकार्ड कसे दुरुस्त करावे. आशा आहे की आपल्याला आजची आमची ही पोस्ट आवडली असेल, आणि दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी पडली असेल. जर आपल्याला या पोस्टमध्ये कोणतीही माहिती समजली नसेल, किंवा आपल्याला पॅनकार्ड दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही समस्या आली असेल तर आपण आम्हाला कमेंट करून विचारा. आम्ही लवकरच तुमची पुर्ण मदत करू.

Share on:

Leave a Comment