जनधन खात्याचे बॅलन्स मोबाईलवरुन कसे चेक करावे ? I Jandhan Khatyache Balance Mobilevarun Kashe Check Karave?

जसे की तुम्ही सर्वजन जाणता आहात झिरो बॅलेन्स मध्ये खाते उघडण्यासाठी सरकारने योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत देशातील सर्व लोक आपले खाते उघडू शकतात. ज्यांचे वय १० वर्षाहून अधिक आहे, बहूसंख्य लोकांनी जनधन योजनेमध्ये आपली खाती उघडली आहेत. पण जनधन खात्यातील पैसे कसे चेक करावे याबद्दल माहिती नसते. हि माहिती चेक करण्यासाठी बॅंकत जाऊन तासनतास रांगेत उभे रहावे लागते. तर आज आम्ही तुम्हा लोकांना जनधन खात्यातील पैसे चेक करण्याचा सोपा उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता.

केंद्र सरकारने कोरोना काळात देशातील सर्व जनधन खात्यातील महिला खातेदारांना कित्येक महिने ५०० रुपयांची आर्थिक मदत करत होते. आणि    ब-याच वयस्कर लोकांसाठी वृद्ध पेंशन सुद्धा जनधन खात्यात जमा होतात. यासाठी सर्वांना पैसे चेक करण्यासाठी बॅंकेत फेरी मारावी लागते, ही फरपट पाहून सरकारने वेबसाईट चालू केली आहे. कारण सर्व जनधन खाते धारक आपले पैसे घरबसल्या आपल्या मोबाईलच्या मदतीने चेक करू शकता. जर तुम्हीही आपले जनधन खात्यातील पैसे चेक करू इच्छित असाल तर हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचून समजून घ्या.

जनधन खात्यातील बॅलेन्स मोबाईल वरून कसे चेक करावे ?

जनधन खात्यातील पैसे तुम्ही दोन वेगवेगळ्या उपायांनी चेक करू शकता, येथे दोन्ही उपाय अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे. तर या जास्त वेळ न घेता ही प्रक्रिया सांगत आहोत.

  • सर्वात आधी तुम्हाला जनधन खात्यातील पैसे मोबाईल वरून चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊजर वर जाऊन pfms.nic.in टाईप करुन सर्च करावे लागेल, किंवा सरळ या वेबसाईटवर जाण्यासाठी या लिंकचा उपयोग करा.
  • यानंतर तुम्हाला आधी वरच्या रिकाम्या बॉक्समध्ये तुमची जी बॅंक असेल त्या बॅंकेचे नाव भरावे.
  • बॅंकेचे नाव भरल्यानंतर त्याच्या खाली इंटर अकाऊंट नंबर हा ऑप्शन दिसेल त्यात तुमचा खाता नंबर भरा.
  • खाता नंबर भरल्या नंतर त्याच्या खाली इंटर कनफर्म अकाऊंट नंबर हे ऑपशन असेल त्यात तुमचा खाता नंबर भरा.
  • त्यानंतर तुम्हाला खाली चित्रामध्ये दाखवलेले कैप्चा कोड भरायचे आहे, त्यानंतर सेन्ड ओटीपी ऑन रजिस्टर्ड मोबाईल नंबर हे ऑपशन सिलेक्ट करायचे आहे.
  • त्यानंतर मोबाईल नंबरवर मेसेज येईल की तुमच्या जनधन खात्यामध्ये कीती पैसे शिल्लक आहेत.

याप्रकारे तुम्ही जनधन खात्यातील पैसे चेक करू शकता.

जर तुम्ही वर सांगितलेल्या उपायांवरून पैसे चेक करणार नसाल तर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वरून खाली दिलेल्या नंबरांवर मिस्ड कॉल करून चेक करू शकता. १८००४२५३८०० किंवा १८००११२२११ या नंबरवर मिस्ड कॉल करताच मोबईलवर मेसेज द्वारा तुमच्या जनधन खात्याचे तपशिल पाठवले जाईल.

सारांश –

जनधन खात्यातील बॅलेन्स मोबाईल वरून चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊजर वर जाऊन pfms.nic.in टाईप करून सर्च करावे लागेल. त्यानंतर डायरेक्ट फॉर्म उघडेल, त्यामध्ये तुम्हाला बॅंकेचा खाता नंबर आणि कैप्चा  भरून सेंड ओटीपी ऑन रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ऑपशनला सिलेक्ट करावे लागेल, नंतर मेसेज द्वारे तुमच्या जनधन खात्यामध्ये किती पैसे आहेत ही सर्व माहिती येईल.

जनधन खात्यातील बॅलेंस मोबाईल वरून कसे चेक करावे ही सर्व प्रक्रिया वर सविस्तर सांगितलेली आहे, जर तुम्ही हे आर्टिकल लक्ष देऊन समजून घेतलं असेल तर तुम्हाला जनधन खात्यातील पैसे चेक करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

याप्रकारे आम्ही तुम्हा लोकांना या वेबसाईट वर अशा नवीन नवीन सरकारी योजनांन बद्दलमाहिती सांगत राहू, कारण तुम्हाला या योजनांचा लाभ मिळू शकेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जरूर शेअर करा. ज्यामुळे सर्व जनधन खाताधारक आपले पैसे चेक करू शकतात.  धन्यवाद.

Share on:

Leave a Comment