किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा?। Kisan Credit Cardsathi Arj Kasa Karava?

या योजने अंतर्गत सरकार देशातील शेतक-यांना खूप कमी व्याजदरात शेतीची कामे करण्यासाठी १लाख६० हजार रूपयांचे कर्ज देतात. कारण शेतक-यांना शेतीची कामे करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये. जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्या पीकाचा विमाही सहज करू शकता.सरकारने देशातील शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. जर तुम्हीही किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छित असाल तर हे आर्टिकल शेवटपर्यंत समजून घेऊन वाचा.

सरकारने आता या योजनेअंतर्गत शेतींची कामे करणा-या सोबतच पशुपालन करणारे किंवा मासे पालन करणारे यांनाही जोडले आहे, हवे असल्यास तेही आपले किसान क्रेडिट कार्ड बनवून घेऊ शकतात, आणि या योजनेमध्ये खूप कमी व्याजावर लोन मिळवू शकता. बरेच शेतकरी बॅंकेत जाऊन तासनतास रांगेत उभे रहातात. असे होऊ नये म्हणून केंद्र सरकारने वेबसाईट सुरू केली आहे. ज्यामुळे शेतकरी आपले क्रेडिट कार्ड घरबसल्या आपल्या मोबाईलच्या मदतीने बनवू शकतील. तर या आम्ही तुम्हा लोकांसाठी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ही प्रक्रिया सांगत आहोत.

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा?

किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

 • सर्वात आधी तुम्हाला किसान क्रेडिट कार्डसाठा अर्ज करण्यासाठी सरकारची वेबसाईट pmkisan.gov.in ला ओपन करा किंवा सरळ वेबसाईटवर जाण्यासाठी या लिंकचा उपयोग करा.
 • लिंकवर गेल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर कृषी विभागाची वेबसाईट ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला farmer corner या सेक्शनमध्ये download kcc form चा ऑप्शन दिसेल ते सिलेक्ट करावे लागेल.
 • त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्या.
 • फॉर्मचे प्रिंट काढल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा. जसे – आपला पत्ता, मोबाईल नंबर, बॅंक डिटेल्स इत्यादी.
 • फॉर्म भरल्यानंतर सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.
 • त्यानंतर फॉर्म बॅंक अधिका-यांकडे जमा करयचा आहे, त्यानंतर तुमचा फॉर्म बॅंकेचे अधिकारी तपासून पाहातील. त्यानंतर थोड्याच दिवसांनी तुमचे किसान क्रेडिट कार्ड मिळून जाईल.
 • या प्रकारे तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.  

किसान क्रेडिट कार्ड बनविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मोबाईल नंबर
 • जमीनीचे पेपर
 • बॅंकेचे पासबुक
 • पासपोर्ट साईज फोटो

सारांश

pmkisan.gov.in ला ओपन करा. त्यानंतर farmer corner च्या सेक्शनमध्ये download kcc form से तो सिलेक्ट करा.तर फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट काढून घेऊन त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा, आणि बॅंकेत जमा करा. याप्रकारे तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा, याची सर्व प्रक्रिया येथे सविस्तर सांगितलेली आहे. जर तुम्ही हे आर्टिकल शेवट पर्यंत लक्षपूर्वक वाचल असेल, तर किसान क्रेडिट कार्डसाठी सहज अर्ज करू शकता. आशा आहे की तुम्हाला ही सर्व माहीती समजली असेल.

याच प्रकारे आम्ही तुमच्यासाठी या वेबसाईटवर अशा नवीन नवीन सरकारी योजनांबद्दल माहिती सांगत राहू. त्यामुळे तुम्हा लोकांना योजनेचा लाभ मिळू शकेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. ज्यामुळे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment