किसान सम्मान निधी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? । Kisan Sanman Nidhi Yojanecha Online Form Kasa Bharava ?

किसान सम्मान निधी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा – जसे की तुम्ही सर्वजन जाणता आहात की केंद्र सरकार देशातील सर्व लहान व मर्यादा असलेल्या शेतक-यांना प्रत्येक वर्षी ६००० रुपये शेतीचे काम करण्यासाठी देत आहेत. पण ब-याच शेतक-यांचा फॉर्म रद्द होतो. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. जर तुम्ही किसान सम्मान योजनेसाठी अर्ज केला असेल, आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही परत या योजनेचा ऑनलाईन अर्ज करून सरकार कडून दिले जाणारे ६००० रुपये मिळवू शकता.

    आजही देशातील ब-याच शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. कारण त्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला नाही. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ह्या योजनेचा अर्ज भरण्यासाठी वेबसाईट सुरू केली आहे. कारण देशातील सर्व शेतकरी घर बसल्या आपल्या मोबाईल किंवा कंप्युटरच्या सहाय्याने अर्ज करू शकतात.आणि कोणत्याही शेतक-याचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये, या उद्देशाने ही वेबसाईट सुरू केली आहे. जर तुम्हीही या योजनेद्वारे ऑनलाईन अर्ज करणार असाल तर याची सर्व प्रक्रिया सरळ सोप्या भाषेत दिली आहे. यासाठी तुम्हा लोकांना अर्ज  करताना कोणतीही अडचण येऊ नये.

किसान सम्मान निधी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

 • सर्वात आधी तुम्हाला किसान सम्मान निधी योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सरकारची वेबसाईट pmkisan.gov.in ला ओपन करावे लागेल, किंवा सरळ वेबसाईटवर जाण्यासाठी या लिंकचा उपयोग करा.
 • लिंकवर गेल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर किसान सम्मान निधी योजनेची वेबसाईट ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला farmer corner च्या सेक्शन मध्ये new farmer registration चा पर्याय असेल तो सिलेक्ट करा.
 • त्यानंतर काही माहिती विचारली जाईल जसे की- आधार नंबर, मोबाईल नंबर हे भरून सेंड ओटीपी हे ऑप्शन सिलेक्ट करा.
 • यानंतर तुमच्या मोबाईलवर ४ अंकी ओटीपी येईल, तो भरून वेरीफाय करायचे आहे.
 • यानंतर आधार वेरीफाय करण्यासाठी ६ अंकी ओटीपी येईल तो भरून वेरीफाय आधार ओटीपी हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे.
 • आधार वेरीफाय झाल्यानंतर तुमच्या स्र्किनवर फॉर्म ओपन होईल. ज्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे, जसे की- आधी जिल्हा निवडा नंतर विभाग मग गाव त्यानंतर बॅंकेची माहिती इत्यादी प्रकार आहेत.
 • सर्व माहिती भरल्यानंतर एकदा नीट तपासून पहा की काही चुकीचे भरले गेले नाही ना, त्यानंतर सेव्ह बटन सिलेक्ट करा.
 • याप्रकारे तुम्ही किसान सम्मान निधी योजनेमध्ये ऑनलाईन अर्जकरू शकता.

किसान सम्मान निधी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे –

 • जमिनीची कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • बॅंकेचे पासबुक
 • मोबाईल नंबर
 • रेशन कार्ड
 • पासपोर्ट साईज फोटो  

सारांश

किसान सम्मान निधी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सरकारची वेबसाईट pmkisan.gov.in ला ओपन करावे लागेल. त्यानंतर farmer corner च्या सेक्शनमध्ये new farmer registration होईल. ते निवडा नंतर मोबाईल नंबर भरून सेंड ओटीपी करा. नंतर ओटीपी येईल तो भरून वेरीफाय करा. नंतर फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सेव्ह करा.याप्रकारे तुम्ही किसान सम्मान निधी योजनेमध्ये अर्ज करू शकता.

किसान सम्मान निधी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा, याची सर्व प्रक्रिया येथे सविस्तर सांगितली आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व माहिती समजली असेलच, तसेच तुम्हाला किसान सम्मान निधी योजनेमध्ये अर्ज करायला कोणतीही अडचण येणार नाही.

याच प्रकारे आम्ही तुम्हाला या वेबसाईटवरून अशा नवीन नवीन सरकारी योजनांबद्दल माहिती सांगत राहू. त्यामुळे तुम्हा लोकांना त्याचा लाभ मिळू शकेल. हि माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. यामुळे सर्व शेतकरी या योजनेमध्यो अर्ज करू शकतील. धन्यवाद.  

Share on:

Leave a Comment