ऑनलाइन पॅन कार्ड कसा बनवायचा? Online PAN card kasa banvaycha?

ऑनलाइन पॅन कार्ड कसा बनवायचा?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. आज आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगणार की पॅन कार्ड ऑनलाईन कसे बनविले जाते.

या पोस्टमध्ये तुम्हाला पॅन कार्ड च्या संबंधित पूर्ण माहिती मराठीत मिळेल. ज्यामुळे तुम्ही घरी बसल्या पॅन कार्ड बनवू शकता. त्याच बरोबर पॅन कार्ड च्या संबंधित सर्व माहिती प्राप्त करू शकता.

विषय-सूची 

 • पॅन कार्ड कुठल्या कामी येतो? पॅन कार्ड का जरुरी आहे?
 • पॅन कार्ड काय आहे?
 • ऑनलाईन पॅन कार्ड कसे बनवायचे?
 • पॅन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
 • पॅन कार्डला  मराठी मध्ये काय म्हणतात? पॅन कार्ड चा फुल फॉर्म काय आहे?

पॅन कार्ड कुठल्या कामी येतो? पॅन कार्ड का जरुरी आहे?

जसे आपल्या सर्वांना माहीत आहे की पॅन कार्ड सर्वांसाठी किती महत्त्वाचा आहे. कोणत्याही देशाच्या नागरिकत्वासाठी  पॅन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. असे अनेक अजूनही  कार्ड आहे जसे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड इत्यादी देशाचे नागरिक असल्याचे ओळख करून देते.

म्हणून आज आम्ही पॅन कार्ड बद्दल बोलणार आहोत, जो  आज भारताच्या नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर हा कुठल्याही व्यक्ती जवळ नसेल तर त्याला सरकारी योजनेचे लाभ भेटू शकत नाही.

हल्लीच बोलायचं झालं तर, पॅन कार्ड बँक सेवेसाठी अत्यंत गरजेचे बनले आहे. कोणत्याही व्यक्तीकडे पॅन कार्ड नसेल तर त्याचा बँक मध्ये अकाउंट ओपन करून शकत नाही आणि बँक अकाउंट पहिल्यापासून असेल तर त्याला पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक झाले आहे.

सर्वांनाच माहीत आहे की,पॅनकार्ड हे आता अत्यावश्यक कागदपत्रांपैकी एक झाले आहे. ते प्रत्येक नागरिकाकडे असणे आवश्यक आहे. पॅन कार्डचा वापर प्रामुख्याने रूपये 50000 लेन देण करण्यासाठी, इनकम टैक्स रिटर्न भरण्यासाठी, व्यावसायिक उपक्रमासाठी, उद्योग इत्यादींमध्ये कर भरण्यासाठी केला जातो.

परंतु आता नोटबंदी नंतर भारत सरकार ने  पॅन कार्ड ला सर्व बँक अकाउंटशी लिंक करणे आवश्यक केले आहे. या परिस्थितीमध्ये पॅन कार्ड एक महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे म्हणून ते सर्वांकडे असणे आवश्यक आहे. काही जण विचार करत असतील की याला ऑनलाईन कसे बनवायचे. म्हणून सांगतो की याच्यासाठी तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही.

 या पोस्टला शेवटपर्यंत वाचा. या पोस्ट ला फॉलो करून तुम्ही सहजरीत्या पॅन कार्ड घरी बसल्या बसल्या ऑनलाइन बनवू शकता. पॅन कार्ड ऑनलाईन बनवण्यासाठी, हे माहीत असणे आवश्यक आहे की पॅन कार्ड काय आहे. चला मग तर माहीत करून घेऊया.

पॅन कार्ड काय आहे?

पॅन कार्ड हे एक विशिष्ट ओळखपत्र आहे.  PAN (Permanent account number) ज्याला मराठीमध्ये कायम खाते क्रमांक म्हणतात.

याचा वापर प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांसाठी केला जातो.  आयकर कायदा 139A अंतर्गत पॅन कार्ड बनवले जाते.  10 अंकी अल्फान्यूमेरिक संख्या आहे. प्रत्येक संख्येचा स्वतःचा अर्थ असतो.

जर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड बनवायचे असेल.  तर यासाठी तुम्हाला फॉर्म 49a भरावा लागेल, ज्याची माहिती तुम्हाला खाली मिळेल.

ऑनलाईन पॅन कार्ड कसे बनवायचे?

पॅन कार्ड ऑनलाईन मध्ये बनवण्यासाठी तुम्हाला Nsdl ( National Securities Depository ) च्या  Site  वरती जावे लागेल. तुम्ही या साईटवर जाऊन पॅन कार्ड ऑनलाईन मध्ये कसे बनवू शकता आणि यासाठी तुम्हाला कोण कोणत्या डॉक्यूमेंट ची आवश्यकता असेल, याची माहिती खाली दिलेली आहे.

तुमच्याजवळ पॅन कार्ड मिळवण्याचे दोन मार्ग आहेत, तुम्ही ते तुमच्या जवळच्या दुकानात जाऊन ऑनलाइन करू शकता किंवा खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरी बसून तुमच्या Android फोन किंवा लॅपटॉपवरून इंटरनेट च्या मदतीने ते सहज करू शकता. तर चला मग जाणून घेऊया.

पॅन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

आयडी प्रूफसाठी, तुम्ही हे वापरू शकता –

 • आधार कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • राशन कार्ड
 • मतदार आयडी
 • ओळखपत्र
 • पासपोर्ट

 ऍड्रेस प्रूफसाठी, तुम्ही याचा वापर करू शकता –

 • बँक पासबुक
 • वीज बिल
 • टेलिफोन बिल
 • पासपोर्ट
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • राशन कार्ड

तर चला मग माहिती करुन घेऊया की पॅन कार्ड साठी ऑनलाइन अप्लाई कसा करायचा-

 • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड ऑनलाईन मध्ये अप्लाई करण्यासाठी Nsdl च्या ऑफिशियल वेबसाइट वर जावे लागेल.  इथे क्लिक करून www.onlineservices.nsdl.com  तुम्ही या साइटवर जाऊ शकता.
 •  इथे तुमच्यासमोर एक Form ओपन होईल, जिथे तुम्हाला Apply Online आणि Registration असे दोन ऑप्शन दिसतील. त्यापैकी ऑनलाईन वर क्लिक करावे लागेल.
 • ऑनलाइन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल, जिथे तुम्हाला detail भरावे लागतील. खाली तुम्ही detail बद्दल स्क्रीन शॉट मध्ये बघू शकता.
 • Application Type मध्ये New PAN आणि category मध्ये individual ला  सिलेक्ट करा.
 • Application फॉर्ममध्ये पुढे, तुम्हाला तुमचे  पर्सनल डिटेल, नाव, मोबाईल नंबर, ईमेल इत्यादी भरावे लागतील.  ते भरल्यानंतर, कॅप्चा कोड भरावे लागेल आणि सबमिट वर क्लिक करा.
 • पुढे, काही काळ Continue loading वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक, पत्ता, वय इत्यादी भरावे लागतील.
 • पुढे इथे तुम्हाला तुमचा शहर कोड टाकावा लागेल.
 • सर्व माहिती भरा आणि एकदा माहिती चेक करा.
 • आता तुम्हाला पेमेंट करावे लागेल. 110 रुपये पेमेंट केल्यानंतर, खालील सबमिट बटणासह फॉर्म सबमिट करा.
 • तुमचा फॉर्म सबमिट केला गेला आहे.  आता त्याची प्रिंट काढा आणि त्यावर तुमचे २ फोटो टाकून सही करा.
 • आत्ताच तुम्हाला या फॉर्ममध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट लावावे  लागेल आणि ते आयकर विभागाकडे पाठवावे लागेल. 15 ते 20 दिवसात तुमचे पॅनकार्ड पोस्टाद्वारे तुमच्या पत्त्यावर येईल.

टीप – तुम्ही Submit Digitally Through e sign हा  ऑप्शन निवडून तुमचे आधार कार्ड e sign करू शकता.  जेणेकरून तुम्हाला कोणतेही कागदपत्र सादर करावे लागणार नाहीत. जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल, तर मी तुम्हाला हा पर्याय निवडण्याचा सल्ला देईन.

पॅन कार्डला  मराठी मध्ये काय म्हणतात? पॅन कार्ड चा फुल फॉर्म काय आहे?

अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न येतो की पॅनकार्डला मराठी मध्ये काय म्हणतात?  किंवा पॅन कार्डचे फुल फॉर्म  काय आहे?  मी तुम्हाला सांगतो –

पॅन कार्डचे फुल फॉर्म आहे – Permanent account number.

त्याला मराठी मध्ये म्हणतात – कायम खाते क्रमांक.

सारांश 

आज आम्ही ह्या लेखाद्वारे तुम्हाला पॅन कार्ड ऑनलाईन कसे बनवायचे त्यासाठी अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर पणे माहिती शेअर केली आहे. आशा करतो की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी खाली शेअर बटन दिले आहे. दिलेल्या माहिती बद्दल तुमच्या मनामध्ये जर कुठला प्रश्न असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नाचे लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment