पॅन कार्ड बनण्यासाठी काय आवश्यक आहे?
आज आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड सुद्धा अत्यंत महत्वाचे झाले आहे. जर तुम्हाला पॅन कार्ड बनवायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला माहित असायला हवे की पॅन कार्ड बनवण्यासाठी काय आवश्यक आहे? याच्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असायला पाहिजे? या लेखामध्ये पॅन कार्ड बनवण्यासाठी डॉक्युमेंट लिस्ट शेअर केली आहे. यावरून, तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत ते चेक करा.
Table of contents

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट द्वारा पॅन कार्ड बनवण्यासाठी फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि जन्मतारीख संबंधित डॉक्युमेंट्स लागतात. याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही वापरू शकता, त्याची संपूर्ण यादी इथे दिलेली आहे.
पॅन कार्डसाठी लागणारे डॉक्युमेंट्स
- फोटो
- सध्या काढलेले पासपोर्ट साईज चे दोन फोटो लागतील. साईज(3.5X2.5)
- ओळखीचा पुरावा
- आधार कार्ड
- वोटर आयडी
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
- फोटो राशन कार्ड
- शस्त्र परवाना
- केंद्र, राज्य सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रात द्वारे जारी केलेले ओळखपत्र
- फोटोयुक्त पेन्शन खात्याची कॉपी
- पत्त्याचा पुरावा
- आधार कार्ड
- वोटर आयडी
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
- जोडीदाराचा पासपोर्ट
- पोस्ट ऑफिस खाते पासबुक
- इन्कम टॅक्स रिटर्नशी संबंधित डॉक्युमेंट्स
- सरकारने जारी केलेले मूळ रहिवासी प्रमाणपत्र
- याशिवाय, पॅन कार्ड बनवण्यासाठी पत्ता पुरावा म्हणून खाली दिलेली कागदपत्रे देखील वापरली जाऊ शकतात परंतु ते तीन महिन्यापेक्षा जुने असावे.
- विज बिल
- टेलिफोन बिल
- पाणी बिल
- गॅस कनेक्शन कार्ड
- बँक खाते स्टेटमेंट कॉपी
- क्रेडिट कार्ड स्टेटमेंट
- जन्मतारखेचा पुरावा
- जन्म प्रमाणपत्र
- जन्मतारीख चिन्हांकित पेन्शनच्या संबंधित कागदपत्रे
- विवाह प्रमाणपत्र
- दहावीची मार्कशीट
- रहिवासी दाखला
- दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेले प्रतिज्ञापत्र
पॅन कार्ड बनवण्यासाठी यामध्ये सांगितल्या गेलेल्या डॉक्युमेंट्स व्यक्तिगत पॅन कार्ड बनवण्यासाठी आहे. जर तुम्हाला अन्य प्रकारच्या कार्डासाठी अर्ज करायचा असेल तर त्याच्या साठी लागणारी पूर्ण डॉक्युमेंट लिस्ट तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
सारांश
त्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगितले की, पॅन कार्ड बनवण्यासाठी काय आवश्यक आहे. या सर्व डॉक्युमेंट्स मधून तुमच्याकडे ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा, जन्मतारीखचा पुरावा म्हणून जे डॉक्युमेंट उपलब्ध आहेत त्याला सबमिट करावे. जर तुम्हाला पॅनकार्ड बनवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक डॉक्युमेंट्स संबंधित काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता.