प्रधानमंत्री रोजगार योजनेद्वारे लोन कसे मिळेल / Pradhanmantri Rojgar Yojanedware Loan Kase Milel

देशात बेरोजगारीची समस्या सारखी वाढत जात आहे. ही हालत पाहून सरकारने प्रधानमंत्री रोजगार योजना सुरू केली आहे. ज्यामुळे देशातील सर्व बेरोजगार नागरिक या योजनेद्वारे लोन घेऊन आपला रोजगार सुरू करून आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारून चांगल्या त-हेने जीवन जगू शकतील. जर तुम्हीही प्रधानमंत्री रोजगार योजनेद्वारे लोन घेऊ इच्छित असाल तर हे आर्टिकल शेवटपर्यंत नीट वाचून तुम्ही सहज लोनसाठी अर्ज करू शकता.

या योजनेद्वारे देशातील सर्व बेरोजगार नागरिक लोन घेऊ शकतात. ज्यांचे वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे ते इच्छुक नागरिक या योजनेद्वारे २५ लाख रुपयांपर्यंत लोन घेऊ शकतात. बरेच लोक रोजगार सुरू करण्यासाठी लोन घेऊ इच्छित आहेत. पण त्यांना लोन घेण्याची प्रक्रिया माहित नसते. यासाठी सरकारने आता प्रधानमंत्री रोजगार योजनेद्वारे अर्ज करण्यासाठी वेबसाईट सुरू केली आहे ज्यामुळे कोणत्याही लोकांना लोनसाठी बॅंकेत फे-या माराव्या लागू नयेत. जर तुम्हीही या योजनेद्वारे लोन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छित असाल तर याची सर्व प्रक्रिया खाली सोप्या भाषेत सांगितली आहे.

प्रधानमंत्री रोजगार योजनेद्वारे लोन कसे मिळेल?

प्रधानमंत्री रोजगार योजनेद्वारे लोन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

 • सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री रोजगार योजनेद्वारे  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सरकारची वेबसाईट keviconline.gov.in ला ओपन करावे लागेल किंवा सरळ वेबसाईटवर जाण्यासाठी या लिंकचा उपयोग करा.
 • लिंकवर गेल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर प्रधानमंत्री रोजगार योजनेची वेबसाईट ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला PMEGP हे ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल.
 • यानंतर तुमच्या स्क्रिनवर नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला PMEGP portal चा विकल्प  निवडावा लागेल.
 •  PMEGP portal चे ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्या समोर पुढचे ऑप्शन येईल. online application form for individual हे ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल.
 • यानंतर तुमच्या स्क्रिनवर फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. जसे – आपले नाव, आधारनंबर, मोबाईल नंबर, बॅंकेचे पासबुक इत्यादी माहिती भरावी लागेल.
 • फॉर्म भरल्यानंतर पुन्हा एकदा तपासून बघा की कोणतीही चुकीची भरली नाही ना. त्यानंतर खाली चेक बॉक्स असेल तिथे टिक करून save application data चे ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल.
 • याप्रकारे प्रधानमंत्री रोजगार योजनेद्वारे लोनसाठी अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री रोजगार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्टसाईज फोटो
 • जातीचे प्रमाणपत्र
 • रहिवासी दाखला

सारांश

प्रधानमंत्री रोजगार योजनेद्वारे लोन घेण्यासाठी सरकारची वेबसाईट keviconline.gov.in ला ओपन करावे लागेल. त्यानंतर PMEGP चा ऑप्शन निवडायचा आहे. नंतर PMEGP portal चा विकल्प  निवडावा लागेल. नंतर  online application form for individual हे ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल. यानंतर तुमच्या स्क्रिनवर फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून save application data ला निवडायचे आहे. याप्रकारे लोनसाठी अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री रोजगार योजनेद्वारे लोन कसे मिळेल, याची सर्व प्रक्रिया वर सोप्या भाषेत सांगितली आहे. जर तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत नीट वाचले असेल तर तुम्ही सहज या योजनेद्वारे अर्ज करू शकता. आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल.

याप्रकारे आम्ही तुम्हा लोकांसाठी या वेबसाईटवर अशा नवीन नवीन सरकारी योजनांबद्दल माहिती सांगत राहू. त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकेल. हे आर्टिकल आवडले असेल तर नक्की शेअर करा. ज्यामुळे सर्व इच्छुक नागरिक या योजनेद्वारे लोन घेऊन रोजगार सुरू करू शकतील. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment