स्टेशन दरम्यान रनिंग, कॅन्सल, ट्रेनची माहिती शोधा Station darmyan running, cancel trainchi mahiti shodhaa

स्टेशन दरम्यान रनिंग, कॅन्सल, ट्रेनची माहिती शोधा

जर तुमचा भारतीय रेल्वे मध्ये जास्तकरून प्रवास होत असेल किंवा तुम्ही दररोज प्रवास करणाऱ्या पैकी आहात तर तुम्हाला रेल्वेचे वेळापत्रक माहित असणे गरजेचे आहे. ट्रेन किती वाजता स्टेशन वर येईल आणि कुठल्या वेळेला कुठल्या स्टेशन वर असेल, हे आज आपण घरी बसून माहीत करू शकतो. ट्रेन चे स्टेटस माहीत करण्यासाठी भारतीय रेल विभागाने सुविधा प्रदान केली आहे.

त्याच्या व्यतिरिक्त मोबाईल ॲप आणि एसेमेस द्वारा सुद्धा यांचे आगमन आणि प्रस्थान बद्दल माहिती मिळू शकते. चला मग या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार की दोन स्टेशनच्या दरम्यान ट्रेनचे रनिंग आणि कॅन्सल स्टेटस बद्दल माहिती कशी प्राप्त केली जाते.

ट्रेनचे रनिंग, कॅन्सल,आगमन आणि प्रस्थान याविषयी माहिती देण्यासाठी तीन माध्यमे आहेत.आपण ऑनलाइन, मोबाईल ॲप्लिकेशन आणि एसेमेस द्वारा ट्रेन चे स्टेटस माहीत करू शकतो. चला मग सर्वप्रथम ऑनलाईन सुविधा विषयी माहिती घेऊया.

विषय-सूची

  • ट्रेनचे स्टेटस ऑनलाइन कसे चेक करायचे?
  • मोबाईल ॲपद्वारे ट्रेनची येण्याची वेळ कशी चेक करायची?
  • एसएमएसद्वारे ट्रेनची येण्याची आणि सुटण्याची वेळ कशी कळेल?

ट्रेन चे स्टेटस ऑनलाइन कसे चेक करायचे?

यासाठी सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in/ntes  या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर केंद्रीय रेल्वेचे ऑफिशियल वेबसाइट ओपन होईल. इथे सर्व प्रकारची माहिती मिळू शकते. जसे लाईव्ह स्टेशन, दोन स्टेशन मधील ट्रेनची वेळ,  कॅन्सल झालेल्या ट्रेनची माहिती.

याच बरोबर रनिंग ट्रेन ची वेळ सुद्धा बघू शकतो. इथे तुम्हाला diverted & rescheduled train ची पूर्ण डिटेल मिळेल. खाली दिलेल्या स्क्रींशोट मध्ये तुम्ही बघू शकता.

अशाप्रकारे आपण घरी बसून ऑनलाईन द्वारा ट्रेनची  येण्याची आणि सुटण्याची वेळ माहीत करू शकतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही मोबाईल ॲप च्या द्वारा सुद्धा या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

मोबाईल ॲपद्वारे ट्रेनची येण्याची वेळ कशी चेक करायची?

आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये NTES App डाऊनलोड करून सुद्धा पूर्ण माहिती घेऊ शकता. यामध्येसुद्धा त्या सर्व सुविधा दिल्या गेले आहेत जे ऑनलाईन मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर रनिंग, कॅन्सल आणि आगमन आणि प्रस्थान याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. तुम्ही एप्लीकेशन येथून डाउनलोड करू शकता.

ऑनलाईन साठी भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाइट वरून आणि NTES मोबाइल App द्वारा ट्रेन चे स्टेटस माहीत करून घेण्याच्या सुविधेबद्दल सांगितले. याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्टेशन दरम्यान रनिंग, कॅन्सल, ट्रेनची माहिती शोधा एसएमएसद्वारा सुद्धा वेबसाईट आणि मोबाईल ॲप च्या प्रमाणे पूर्ण माहिती घेऊ शकता.

एसएमएसद्वारे ट्रेनची येण्याची आणि सुटण्याची वेळ कशी कळेल?

जर तुमच्याजवळ स्मार्टफोन नसेल तर एक नॉर्मल फिचर फोन द्वारे सुद्धा रेल्वे टाईम टेबल च्या संबंधित सर्व माहिती मिळू शकते. त्याच्यासाठी मेसेज बॉक्समध्ये कोड टाईप करावे लागते आणि त्याला 139 वर पाठवावे लागते. जसे-

ट्रेनचे नाव किंवा नंबर जाणून घेण्यासाठी – 

TN 12011 किंवा TN GITANJALI EXPRESS

ट्रेनचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी-

TIME <TRAIN NUMBER> जसे – TIME 12012

ट्रेनचे रनिंग स्टेटस जाणून घेण्यासाठी-

SPOT <TRAIN NUMBER> जसे – SPOT 12012

अशा प्रकारे आपण एसएमएसद्वारे ट्रेनची स्टेटस देखील जाणून घेऊ शकतो.  दोन स्टेशनच्यामध्‍ये रनिंग, कॅन्सल ट्रेनची माहिती मिळवण्‍यासाठी आपण या तीन सुविधेचा वापर करू शकतो.

सारांश

या पोस्टमध्ये तुम्हाला सांगितले की घरी बसून आपण ट्रेनचे आगमन आणि प्रस्थान विषयी कसे माहिती करू शकतो. या पोस्ट द्वारा  तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता.

ऑनलाइन, मोबाईल ॲप आणि एसएमएसद्वारे दोन  स्टेशनच्यादरम्यान रनिंग, कॅन्सल, ट्रेनची माहिती संबंधित पोस्ट आवडल्यास ही पोस्ट शेअर करायला विसरू नका. शेअर करण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटणाचा उपयोग करा. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment