वृद्धा पेंशन लिस्टमध्ये आपले नाव कसे बघावे / Vrudha Pension Listmadhe Apale Nav Kase Baghave

वृद्धा पेंशन लिस्टमध्ये आपले नाव कसे बघावे

आज आम्ही तुम्हा लोकांना जी माहिती सांगणार आहोत की देशातील सर्व राज्यातील वृद्ध लोक वृद्धा पेंशन लिस्टमध्ये आपले नाव बघू  शकतात. बरेच लोक वृद्धा पेंशनसाठी अर्ज करतात पण त्यांना पेंशन मिळत नाही. हे जाणून सरकारने ऑनलाईन पेंशन लिस्ट बघण्यासाठी वेबसाईट सुरू केली आहे. आज आम्ही तुम्हा लोकांना वृद्धा पेंशन लिस्टमध्ये आपले नाव बघण्याचा सोपा उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या सहज आपल्या मोबाईलद्वारे बघू शकता.

जसे की तुम्ही सर्वजण जाणता आहात की सरकार देशातील वृद्ध व्यक्ती ज्यांनी ६० वर्ष पुर्ण केली आहेत त्यांना प्रत्येक महिन्यात पेंशन स्वरूपात आर्थिक मदत करत आहे. कारण कोणत्याही वृद्ध व्यक्तींना आपल्या परिवारावर अवलंबून रहावे लागू नये, आणि कोणाकडेही हात पसरावे लागू नयेत या योजनेमुळे देशातील सर्व वृद्ध व्यक्तींना खूप मदत मिळत आहे. वृद्धा पेंशन लिस्टमध्ये आपले नाव बघू इच्छित असाल तर हे आर्टिकल वाचून तुम्ही तुमचे नाव लिस्टमध्ये बघू शकता.

ऑनलाईन वृद्धा पेंशन लिस्टमध्ये आपले नाव बघण्यासाठीची प्रक्रिया

  • सर्वात आधी तुम्हाला वृद्धा पेंशन योजनेच्या लिस्टमध्ये आपले नाव बघण्यासाठी सरकारची वेबसाईट nsap.nic.in ला ओपन करावे लागेल, किंवा सरळ वेबसाईटवर जाण्यासाठी या लिंकचा उपयोग करा.
  • लिंकवर गेल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर पेंशन योजनेची वेबसाईट ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला reports  हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला list of reports च्या सेक्शनमध्ये  state dashboard चा ऑप्शन दिसेल, तो सिलेक्ट करावा लागेल.
  • यानंतर तुमच्या स्क्रिनवर नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला state च्या ऑप्शनमध्ये आपले राज्य निवडावे लागेल. नंतर कैप्चा कोड भरून submit बटन सिलेक्ट करा.
  • त्यानंतर आपल्या राज्यात जेवढे जिल्हे आहेत त्या सर्वांची लिस्ट समोर ओपन होईल. ज्यामध्ये आपल्या जिल्ह्याची लिस्ट शोधून ते सिलेक्ट करा.
  •  आपला जिल्हा निवडल्यानंतर जिल्ह्यात जेवढे ब्लॉक आहेत ती सर्व लिस्ट ओपन होईल, ज्यामध्ये आपला ब्लॉक निवडून तो सिलेक्ट करा.
  • ब्लॉक निवडल्यानंतर तुम्हाला आपली ग्रामपंचायत निवडायची आहे, त्यानंतर तुमच्या पंचायतीत जेवढे वृद्धा पेंशनच्या लाभार्थ्यांची लिस्ट ओपन होईल, त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव बघू शकता.
  • याप्रकारे तुम्ही वृद्धा पेंशनच्या लिस्टमध्ये आपले नाव सहज बघू शकता.

सारांश

वृद्धा पेंशन लिस्टमध्ये आपले नाव बघण्यासाठीसरकारची वेबसाईट nsap.nic.in ला ओपन करावे लागेल, त्यानंतर reports चा ऑप्शन निवडायचा आहे. नंतर state dashboard चा विकल्प निवडावा लागेल. नंतर आपले राज्य निवडून कैप्चा कोड भरून submit बटन निवडून त्यात आपला जिल्हा निवडून, आपले ब्लॉक निवडून, आपली पंचायत निवडून झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची लिस्ट ओपन होईल ज्यामध्ये आपले नाव बघू शकता.

वृद्धा पेंशन लिस्टमध्ये आपले नाव कसे बघावे, याची सर्व प्रक्रिया वर सविस्तरपणे सांगितली आहे. जर तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत नीट वाचले असेल तर तुम्हाला वृद्धा पेंशन लिस्टमध्ये आपले नाव बघण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. आशा आहे की तुम्हा लोकांना ही माहिती आवडली असेल.

याप्रकारे आम्ही तुम्हा लोकांसाठी या वेबसाईटवरून अशा नवीन नवीन सरकारी योजनांबद्दल माहिती सांगत राहू. त्यामुळे तुम्हा लोकांना त्याचा लाभ मिळू शकेल. ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. ज्यामुळे सर्व वृद्धा पेंशनचे लाभार्थी या  लिस्टमध्ये आपले नाव बघू शकता. धन्यवाद.

Share on:

Leave a Comment