Green Handbag

News

जगातली सर्वांत सुंदर ट्रक ड्रायव्हर! कोण आहे जाणून घ्या 

By Mr. Marathi

आजही हे क्षेत्र फक्त पुरुषांचं मानलं जातं. त्यात आव्हानं खूप आहेत, कष्टही खूप आहेत, तरीही जगभरात बोटावर मोजता येण्याइतक्या महिलांनी याही क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे.

कोणती कामं पुरुषांनी करावीत, कोणती कामं स्त्रियांनी करावीत? एकमेकांनी दुसऱ्यांच्या कोणत्या कामांबाबत हस्तक्षेप करू नये?... पूर्वी याबाबत अतिशय कडक असे संकेत होते. कालांतराने हे संकेत मोडत गेले.

मुख्यत: महिलांनी स्वबळावर आणि स्वकष्टानं हे संकेत मोडून काढले आणि पुरुषप्रधान क्षेत्रातही आपलं नाव कोरायला सुरुवात केली. आज तर असं एकही क्षेत्र नाही, ज्यात महिलांनी आपलं पाऊल रोवलेलं नाही, तरीही संकेत मात्र तेच जुने-पुराणे आहेत.. ‘अमुक अमुक’ क्षेत्रात महिलांनी पुरुषांची बरोबरी करू नये किंवा त्यात बळजबरी घुसू नये..

यातलंच एक क्षेत्र आहे ट्रक ड्रायव्हिंग! आजही हे क्षेत्र फक्त पुरुषांचं मानलं जातं. त्यात आव्हानं खूप आहेत, कष्टही खूप आहेत, तरीही जगभरात बोटावर मोजता येण्याइतक्या महिलांनी याही क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे.

ऑस्ट्रेलियाची ब्लेझ विल्यम्स ही त्यातली एक महत्त्वाची ट्रक ड्रायव्हर. संपूर्ण जगभरात आज तिचं नाव आहे. सोशल मीडियावर तर ती अक्षरश: झळकत असते. ट्रक ड्रायव्हिंगमध्ये तर ती निष्णात आहेच; पण तिचं सौंदर्य हा सध्या मोठा चर्चेचा विषय आहे. तिचे कुरळे साेनेरी केस, निळे डोळे, कोणीही फिदा व्हावं अशी फिगर.

मॉडेल किंवा अभिनेत्री म्हणून सहज कुठेही काम मिळू शकेल असं तिचं सौंदर्य असतानाही दिवसातले बारा-तेरा तास ती ट्रकच्या व्हीलमागे बसलेली असते. सध्या सोशल मीडियावर ती फारच व्हायरल आहे.

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड येथील ब्लेझला लहानपणापासूनच वाहनांचं मोठं आकर्षण होतं. त्यातही ट्रकसारख्या अवजड वाहनांच्या तर ती प्रेमातच होती. त्यामुळे तिनं मोठं झाल्यावर ट्रक ड्रायव्हरच व्हायचं ठरवलं आणि तशी ती झालीही

बऱ्याचदा दिवसातून बारा-चौदा तास ट्रक ड्रायव्हिंग करावं लागलं, त्यात प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकावट झाली, तरीही हे काम ब्लेझला मनापासून आवडतं. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून ती ट्रक ड्रायव्हिंग करते आहे. त्यापासून ती चांगला पैसाही  कमावते.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले, आता बघा.

कीर्तनाला जाताना इंदुरीकर महाराजांचा अपघात, सुरक्षित