पाहा राज ठाकरेंच्या नातवाचा पहिला फोटो, होतोय सोशल मीडियावर व्हायरल.
By Mr. Marathi
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आनंदाचा सोहळा सुरू झाला. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना पुत्ररत्न झाल्याने ठाकरे कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे
अमित ठाकरेंनी रविवारी त्यांच्या बाळाचा फोटो फेसबुकवरुन शेअर केला आहे. सध्या हा फोटो व्हायरलही झाला आहे. फोटोसोबत केवळ हर्टचे इमोजी शेअर करण्यात आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा झाले असून अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. राज ठाकरेंना नातू झाला ही बातमी कार्यकर्त्यांमध्ये पसरताच मोठा उत्साह साजरा करण्यात आला.
मंगळवारी सकाळी राज ठाकरेंची सून मिताली ठाकरे यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मुंबईतील ब्रीच कँन्डी हॉस्पिटलमध्ये आई-मुलगा दोघंही सुखरुप आहेत.
अमित ठाकरेंना पुत्ररत्न झाल्याचं समजताच शिवतीर्थावर पेढे वाटप करण्यात आले. नातवाच्या आगमनाने राज ठाकरे आजोबा तर शर्मिला ठाकरे या आजी झाल्या आहेत.
२७ जानेवारी २०१९ रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला होता. लोअर परळमधील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलंय.
ट्विटरवर सर्वात लोकप्रिय कोण ? ओबामा पहिल्या क्रमांकावर, मोदींचा नंबर काय ?